Ad will apear here
Next
बा विठ्ठला.. महाराष्ट्राला करोनामुक्त कर!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले विठ्ठलाच्या चरणी साकडे


सोलापूर :
‘महाराष्ट्रासह अवघ्या देशाला करोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे,’ असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज (एक जुलै) घातले. 

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा बुधवारी पहाटे करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.



श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु. चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्याची निवड झाली होती. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी ही महापूजा केली.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘करोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश करोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो आहे.’ बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. ‘पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत,’ असे त्यांनी सांगितले. 



‘करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी,’ असे आवाहन श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी संप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. या वेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्या वतीने पाच कोटी रुपयांच्या अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.









 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BYTQCO
Similar Posts
महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेलपानांची सजावट महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरात बेलाच्या पानांची सजावट करण्यात आली होती. त्याचे हे फोटो...
माघी वारीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सजावट पाच फेब्रुवारी २०२० रोजी जया एकादशी आहे. त्या निमित्ताने पंढरपुरात माघी यात्रा असते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने या यात्रेनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व तसेच मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिराला विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. त्याची ही छायाचित्रे
... आणि विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह झाला...! पंढरपूर : दर वर्षीप्रमाणेच यंदाही प्रथेप्रमाणे पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह वसंत पंचमीच्या मुहूर्तावर (३० जानेवारी २०२०) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यासाठी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. या सोहळ्यासाठी दोन्ही मंदिरांना सुमारे १०-१२ प्रकारच्या आणि १५
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त केलेली सजावट गुढीपाडव्यानिमित्त आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चाफा, गुलाब, तुळशी व मोगऱ्याच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्याचे हे फोटो...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language